Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ख्रिस्ती समाजाच्या विविध समस्या विधानसभेत मांडू व सोडवू; बापूसाहेब पठारे यांचा निश्चय

मार्कस पंडित यांच्या माध्यमातून चर्चासत्रात वडगावशेरी मतदारसंघातील सर्व कॅथोलिक चर्चचा सहभाग
पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | खराडी येथे ख्रिस्ती समाजाचे नेते मार्कस पंडीत यांच्या नेतृत्वाखाली ख्रिस्ती समाजाच्या विविध समस्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांच्या प्रमुख उपस्थित हे चर्चासत्र पार पडले.
यावेळी संत फ्रान्सिस डी सेल्स चर्च, डीव्हाईन मर्सी चर्च, क्राईस्ट द किंग चर्च, कार्मिल चर्च, होली फॅमिली चर्च लोहगाव त्याचप्रमाणे कॅथलिक असोसिएशन ऑफ पुणे, वडगावशेरी मायनॉरीटी काँग्रेस आय पार्टी, ख्रिश्चन कोकणी संघटना, तमिळ ख्रिचन संघटना, एस एफ मराठी कॅथलिक संघटना, मिलाग्रास फाउंडेशन वडगावशेरी, पुणे कोकणी ख्रिस्त सभा, ख्रिस्त जागृती मंच या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तरपणे विविध विषयांवर चर्चा केली.
आगामी निवडणुकीसाठी या सर्व संघटनांनी व ख्रिस्ती समाजाने बापूसाहेब पठारे यांना पाठींबा जाहीर केला. तसेच, ख्रिस्ती समाजाच्या समस्या विधानसभेत मांडण्याची विनंती पठारे यांना केली. “ख्रिस्ती समाजाने दिलेला पाठिंबा फार महत्त्वाचे योगदान देणारा ठरेल. येणाऱ्या काळात विविध माध्यमातून ख्रिस्ती समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडू व त्यावर नक्कीच तोडगा काढू”, असे आश्वासन बापूसाहेब पठारे यांनी दिले.
यावेळी जयप्रकाश पारखे (सचिव, महाराष्ट्र राज्य प्रोग्रेसिव्ह पीपल काँग्रेस पक्ष), जॉन फर्नाडिस (अध्यक्ष, मिलाग्रास फाउंडेशन), जो रोड्रिग्ज (अध्यक्ष, कोकणी सभा), एडविन अलेक्स (अध्यक्ष, तामिळ सभा), रविभाऊ कांबळे (अध्यक्ष, मराठी सभा व सरचिटणीस, काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती जमाती), जो कसबे (पुणे धर्मप्रांत अध्यक्ष कॅथलिक असोसिएशन), ए वी थॉमस (धानोरी चर्च), स्वप्नील साळवे सर ( क्राईस्ट द किंग चर्च), मॅथ्यू थॉमस (कार्मेल चर्च), पासकल लोपोझ, बेंजामिन डिकोस्टा, अँथॉनी फर्नांडिस, मधुकर सदाफुले, अमर पंडीत इ. विविध संघटनांचे मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.