Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी मतदार संघातील विविध भागात भेट देत बापूसाहेब पठारेंचा नागरिकांशी संवाद; म्हणाले – ‘वडगावशेरीला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी मायबाप जनतेचा आशीर्वाद हवा’

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. वडगावशेरी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) सुनील टिंगरे (Sunil Tingre) तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यंदाची ही निवडणूक रंगतदार होणार आहे.
दरम्यान काल (दि.१२) बापूसाहेब पठारे यांनी पदयात्रेच्या माध्यमातून यशवंत नगर, राघवेंद्र नगर, तुकाराम नगर, शेजवळ पार्क, सोनई पार्क, विडी कामगार ह्या परिसरात भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी परिसरातील नागरिकांच्या भरभरून उत्साहाने, प्रेमाने स्वागत केले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
बापूसाहेब पठारे म्हणाले, ” आपल्या वडगावशेरीला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी मायबाप जनतेचा आशीर्वाद हवा आहे आणि त्याचसाठी निवडणुकीच्या निमित्ताने आज मतदार संघातील विविध भागात भेट देत नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यानंतर मी कसा योग्य उमेदवार आहे हे त्यांच्या बोलण्यातून प्रतीत होत आहे. ह्यातून आमचा आत्मविश्वास वाढतो आहे”, असे पठारे यांनी सांगितले.