Jayant Patil On Ajit Pawar | ‘अण्णा बनसोडेंसारखी उद्योगी माणसे अजित पवारांना आवडतात’, जयंत पाटलांचे टीकास्त्र; म्हणाले – “कोणी पक्ष सोडला म्हणून…”

Jayant-Patil-Ajit-Pawar-2

पिंपरी : Jayant Patil On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) सुलक्षणा शिलवंत (Sulakshana Shilwant-Dhar) तर अजित पवार गटाकडून अण्णा बनसोडे (Anna Bansode) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दरम्यान आज (दि.१३) उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रचारसभा पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील म्हणाले, ” उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ ला सुलक्षणा धर यांना तिकीट द्यायला सांगितले, मात्र, ऐनवेळी त्यांनीच ते तिकीट अण्णा बनसोडेंकडे फिरवले. मागच्या वेळी त्यांनी जी चूक केली, ती यावेळी आम्ही दुरुस्त केली. आमदार बनसोडेंसारखी उद्योगी माणसे अजित पवारांना आवडतात, म्हणून त्यावेळी आमचा पक्ष अडचणीत आला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

“शहरातील व्यावसायिकांना धमक्या येतात, हप्ते घेतले जातात. गुन्हेगारांना प्रवृत्त करून त्यांना बळ देण्याचे काम करणारा चित्रपटात ‘अण्णा’ करत असतो. तसाच अण्णा तुमच्या मतदारसंघात आहे. सगळे उद्योग तो अण्णा नावाचा माणूस करतो.”

ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले मात्र कोणीही बोलायला तयार नाही. महायुती सरकारमध्ये एकही मोठा प्रकल्प आला नाही. तिजोरी खाली केली आहे. महाराष्ट्राला कर्जाखाली लोटले आहे. गरिबांना जास्त कर आणि श्रीमंतांना कमी कर हे या महायुतीचे पाप आहे.

कोणी पक्ष सोडला म्हणून शरद पवार यांचा पक्ष थांबला नाही. सगळे होते तेव्हा चार खासदार होते. सगळे सोडून गेले, तेव्हा आठ खासदार झाले. सगळ्यात स्वच्छ पक्ष म्हणून शरद पवारांचा पक्ष उदयास आला आहे.”