Mahadev Jankar On BJP | महादेव जानकरांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले – ‘शिंदे अन् अजितदादांनी सावध राहावं, भाजप तुमच्याकडे ताकद आहे तोपर्यंत वापरते’

Mahadev-Jankar-On-Ajit-Pawar-1

परभणी : Mahadev Jankar On BJP | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरु आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी लढत पाहायला मिळणार आहे. सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडालेला असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सावध राहण्याचा इशारा देत भाजपवर निशाणा साधला आहे.

महादेव जानकर हे आज परभणी दौऱ्यावर आहेत. परभणीतील त्यांच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ ते विविध ठिकाणी भेटी देत आहेत, बैठका घेत आहेत. दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. “भारतीय जनता पार्टी ही तुमची ताकद घेऊन तुम्हाला वापरणारी पार्टी आहे”, असा घणाघात जानकर यांनी केला आहे.

महादेव जानकर म्हणाले, ” महायुतीने मला बोलावलं नाही, त्यामुळे मी तिकडे गेलो नाही. स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टी ही तुमची ताकद घेऊन तुम्हाला वापरणारी पार्टी आहे. माझे आमदार यांनी फोडले त्यामुळे माझ्यासोबत भाजपाचा अनुभव अत्यंत वाईट आहे. एकनाथ शिंदे आणि अजित दादांनी सावध वागावं स्वतःच्या पक्षाची किंमत वाढवावी”, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले आहे.