Viman Nagar Pune Crime News | सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide Case

पुणे : Viman Nagar Pune Crime News | माहेरुन पैसे आणले नाही या कारणावरुन सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली (Suicide Case). नयना प्रकाश माघाडे (वय २६, रा. विठ्ठल निवास, संतनगर, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेची नावे आहे.

याबाबत विवाहितेचा भाऊ जय खरात (वय २८, रा. निंबगाव जाळी ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार संतनगरमधील विठ्ठल निवास येथे ८ नोव्हेबर २०२४ रोजी घडला. त्यावरुन पोलिसांनी प्रकाश माघाडे (वय ३२) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण नयना हिचा विवाह प्रकाश माघाडे याच्याशी २०२० मध्ये झाला होता. विवाहानंतर वेळोवेळी माहेरुन पैसे आणले नाही, या कारणावरुन तसेच तिचे चारित्र्यावर संशय घेऊन प्रकाश तिला मारहाण करत असे. तिला माहेरी सोडून तू तिकडेच रहा, परत माझ्या घरी येऊ नको, मला तुला नांदवायचे नाही, अशी धमकी तिला देत असे. तिचा शारीरीक व मानसिक छळ करीत असे. या छळाला कंटाळून नयना हिने ८ नोव्हेंबर रोजी बेडरुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.