Swargate Pune Crime News | पुणे : गावठी पिस्तुल बाळगणार्यास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद (Video)

पुणे : Swargate Pune Crime News | रेकॉर्डवरील गुन्हेगाराला (Criminal On Police Record) गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) जेरबंद केले आहे. श्याम युवराज उमाप Shyam Yuvraj Umap (वय २४, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी – Meenatai Thackeray Vasahat Gultekdi) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे असा २१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. (Pistol Seized)
सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर (API Rahul Kolambikar), पोलीस अंमलदार सुधीर इंगळे, संदीप घुले, सुजय पवार हे विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने अवैदय धंदे, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे व गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे (PI Yuvraj Nandre) यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम उमाप हा पिस्तुल विक्रीसाठी कॅनॉल रोडवरील उप मृदा सर्वेक्षण कार्यालया बाहेर उभा आहे.
या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर हे आपल्या सहकार्यांसह तेथे गेले. त्यांनी कोणाची तरी वाट पहात थांबलेल्या श्याम उमाप याला पकडले. त्याच्याकडून १ गावटी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (Smartana Patil IPS), सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे (Rahul Aware ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, पोलीस अंमलदार सुधीर इंगळे, संदीप घुले, सुजय पवार, रमेश चव्हाण, तनपुरे, फिरोज शेख, दीपक खेंदाड, हर्षल शिंदे, दुधे, मोराळे, टोणपे यांनी केली आहे.