Bibvewadi Pune Crime News | चार महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : Bibvewadi Pune Crime News | तडीपार केल्यानंतरही पुणे शहरात येऊन गुन्हेगारी कृत्य चालू ठेवल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी त्याला एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबद्ध करण्याची कारवाई केली होती. या कारवाईची माहिती मिळताच सराईत गुन्हेगार फरार झाला. गेली चार महिने फरार असलेल्या या गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police) पकडले.
किरण राजू खवळे Kiran Raju Khawle (वय ३०, रा. गणेशनगर, अप्पर बिबवेवाडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. किरण राजू खवळे हा सराईत गुन्हेगार असून त्याला २०१६ मध्ये तडीपार करण्यात आले होते. असे असतानाही तो शहरात येऊन रहात असल्याचे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले होते. तडीपार (Pune Police Tadipari Action) असतानाही त्याची गुन्हेगारी कृत्ये चालू होती. हे लक्षात घेऊन चार महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करुन स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. स्थानबद्ध केल्याची माहिती मिळताच किरण खवळे याला फरार झाला होता. त्याचा शोध घेतला जात होता.
आरोपीचा शोध घेतला जात असताना पोलीस अंमलदार शिवाजी येवले यांना किरण खवळे हा फुरसुंगी येथे रहात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने फुरसुंगीला जाऊन किरण खवळे याला ताब्यात घेतले. स्थानबद्धतेचा आदेश बजावून त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, प्रशांत धोत्रे, संतोष जाधव, पोलीस अंमलदार ज्योतिष काळे, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, प्रणश पाटील, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.