Pune Cantonment Assembly Election 2024 | पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सुनील कांबळेंच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा; ‘मतदार यंदाही भाजपलाच साथ देतील’, सुनील कांबळे यांचा विश्वास

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Cantonment Assembly Election 2024 | कॅंटोन्मेंट मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस (BJP Vs Congress) असा थेट सामना होणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble MLA) यांच्यासमोर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री असलेले रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांचे आव्हान असणार आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रभाग २५ भागातील व वॉर्ड क्र ०६ मधील वानवडी बाजार इथून सुनील कांबळे यांच्या भव्य पदयात्रेची सुरुवात झाली. पदयात्रेच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत कांबळे यांनी विनम्र अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे पुणे शहराचे सरचिटणीस महेश पुंडे, नगरसेविका कालिंदाताई पुंडे, नगरसेवक धनराज घोगरे, लक्ष्मीताई घोगरे, कोमल शेंडकर, समीर शेंडकर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला, दिनेश होले यांच्याद्वारे पदयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. मतदार यंदाही भाजपलाच साथ देतील, असा विश्वास सुनील कांबळे यांनी व्यक्त केला.
या पदयात्रेसाठी भाजपा, राष्ट्रवादी,शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि सर्व मित्रपक्षाचे कॅन्टोन्मेंट चे पदाधिकारी कॅन्टोन्मेंटचे राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस दिलीप जांभुळकर, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, मुनीर सय्यद, नेते प्रसाद चौघुले,दत्ता जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नेते संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, नेते महेंद्र कांबळे, संदीप धांडोरे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस महेश पुंडे, स्थानिक नगरसेविका कालिंदा पुंडे, नगरसेवक धनराज घोगरे, लक्ष्मी घोगरे,सौ.कोमल शेंडकर, सचिन मथुरावाला, दिलीप गिरमकर, अल्काताई मथुरावाला, माधुरी गिरमकर, समीर शेंडकर, दिनेशप्रसाद होले, रफिक शेख, पल्लवी केदारी, दिप्ती सेठिया, स्मिता खेडेकर, विवेक शिंदे, तात्या शेंडकर, प्रविण खेडेकर, प्रकाश शेंडकर ,विलास ताकवले, उमेश शिंदे, अतुल भुजबळ, गणेश यादव, कार्तिक घोगरे, मधू पुंडे, सागर गव्हाणे, सुधाकर कारके, शक्ती येसादे, रमेश अहिरकर, अतुल भुजबळ, प्रताप पुंडे, अमर वणवे, अनिकेत कांबळे, मंजुनाथ आचलकर, मोसीन शेख, गणेश शेंडकर, विक्रांत आर्या, माउली अवचित्ते, प्रकाश जगधने, मनीष मथुरावाला ,निलेश राऊत, आशिष सुर्वे, अझिम गुडाकूवाला, विपेश सोनिग्रा, संकेत जांभुळकर, चंद्रकांत बोऱ्हाडे, अजिंक्य वाळेकर, गणेश निकम, चेतन कांबळे, गणेश शेंडकर, चैतन्य खांदवे, तसेच अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच पदयात्रेत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), राष्ट्रीय समाज पक्ष, लहुजी शक्ती सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, युवा स्वाभिमान पक्ष, जनसुराज्य पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), भीमशक्ती, रयत क्रांती संघटना, जनता दल सेक्युलर, जय मल्हार क्रांती संघटना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, दलित पँथर, भीमसेना, युवा सुराज्य संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, युवा रिपब्लिकन पार्टी, लहुजी साळवे बहुजन क्रांती या पक्षांचा सहभाग होता.