Parvati Assembly Election 2024 | तळजाई येथे आबा बागुल यांनी नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी, “आबा तुम्ही, ‘पर्वती’चे हिरा आहात, हे तर शुभसंकेत”, नागरिकांच्या प्रतिक्रिया

Aba Bagul

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Parvati Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. प्रत्येक मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात आबा बागुल (Aba Bagul) अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सलग ६ वेळा ते नगरसेवक असलेले आबा बागुल आता आमदार व्हायचेच या इराद्याने कामाला लागले आहेत. बागूल यांनी पर्वतीमधील माता-भगिनींसह नागरिकांची घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. पदयात्रा, प्रचार रॅली, बैठका, सभा यांच्या माध्यमातून ते नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान (दि.९) आबा बागुल यांनी तळजाई येथे नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आबा तुम्ही, ‘पर्वती’चे हिरा आहात, आणि तुम्हाला निवडणूक चिन्हही ‘हिरा’ मिळाले आहे.” हा शुभसंकेत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

आबा बागुल म्हणाले,”नागरिकांच्या प्रतिसादामुळे विजयाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. आता एकच निर्धार विजयाचा आहे, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणारच. तसेच मतदारसंघातील प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढत कामे पूर्णत्वास नेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.