Kothrud Assembly Election 2024 | कोथरुड विधानसभा मतदारसंघ : स्वराज्य सेनेचा चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा

Chandrakant-Patil

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Kothrud Assembly Election 2024 | मराठा समाजासाठी (Maratha Samaj) काम करणाऱ्या स्वराज्य सेनेने कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांना बिनशर्त पाठिंबा दिला असून; सेनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी यांनी बिनशर्त पाठिंब्याचे पत्र चंद्रकांतदादा पाटील यांना दिले.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने वातावरण दिसत आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना ही व्यापक समर्थन मिळत असून; आज मराठा समाजासाठी काम करणाऱ्या स्वराज्य सनेने चंद्रकांतदादा पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचे पत्र सेनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज चंद्रकांतदादा पाटील यांना दिले.