Sharad Pawar News | शरद पवार यांचे धक्कादायक विधान, म्हणाले – “सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा तेव्हा तिचे पती सदानंद सुळे यांना…”

मुंबई : Sharad Pawar News | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सुडाच्या राजकारणावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

शरद पवार म्हणाले, ” आमच्याविरोधात पैसा आणि यंत्रणेचा वापर झाला. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझी मुलगी सुप्रिया सुळे (Supriya Sule) चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आली आहे. ती जेव्हा जेव्हा सरकारवर आक्रमक टीका करते, तेव्हा तेव्हा तिचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांना प्राप्तिकर विभागाची (IT Dept Notice) नोटीस येते.

एवढेच नाही, तर माझे बंधू (दिवंगत अनंतराव पवार) यांच्या मुलींनाही (अजित पवारांच्या भगिनी) अशाच प्रकारे त्रास दिला गेला. केंद्र सरकारने माझ्या कुटुंबाविरोधात यंत्रणेचा गैरवापर केला. हे असे याआधी घडलेले आम्ही कधीच पाहिले नव्हते”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.