PM Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेमुळे दोन दिवस शहरात ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायको -लाईट, एअरक्राप्ट, पॅराग्लायडरचा वापर करण्यास मनाई

पुणे : PM Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ नोव्हेबर रोजी प्रचारासाठी पुणे शहराच्या दौर्यावर येणार आहेत. त्यामुळे शहरात ११ व १२ नोव्हेंबर रोजी ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायको -लाईट एअरक्राप्ट, पॅराग्लायडरचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आदेश काढले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ नोव्हेबर रोजी पुणे दौर्यावर येणार आहेत. त्यांची स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार आहे. ते लोहगाव येथील हवाई दलाच्या टेक्निकल एअरपोर्टवर उतरतील. त्यानंतर ते स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर येणार आहे.
दहशतवादी/राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायको -लाईट, एअरक्राप्ट, पॅराग्लायडरचा वापर करुन व्हीव्हीआयपींना लक्ष्य करु शकतात. हे लक्षात घेऊन ड्रोनसह रिमोंट कंट्रोल, मायको – लाईट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडरद्वारे संभाव्य घातपात रोखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. ११ नोव्हेंबर व १२ नोव्हेंबर रात्री २४ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी कळविले आहे.