Maharashtra Assembly Election 2024 | ‘… म्हणून अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना प्रचाराला बोलवलं नाही’, खासदार शाहू छत्रपती यांचा निशाणा

कोल्हापूर : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामतीत (Baramati Assembly Election 2024) पवार विरूध्द पवार (Pawar Vs Pawar) सामना पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार (Sharad Pawar) यांनी युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या आहेत. बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) सभा नको, असे अजित पवार यांनी म्हंटल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
अजित पवार यांच्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत नाहीये त्यावरून कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती (MP Shahu Chhatrapati) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले. ” अजित पवारांना निश्चित वाटत असेल की नरेंद्र मोदी यांच्या येण्याने निगेटिव्ह विचार निर्माण होऊ शकतात. ही शंका त्यांना आल्यानं त्यांनी नरेंद्र मोदींची सभा नाकारली असेल.
राहुल गांधी यांनी दोन मोठ्या पदयात्रा काढल्या असून त्यामुळे खूप मोठा फरक पडलेला आहे. लोक त्यांना भेटत आहेत, लोकांचे प्रश्न काय आहेत हे त्यांना माहिती आहेत. ते एक प्रभावी नेते आहेतच; त्यामुळे राहुल गांधींना विरोध करणे हाच विरोधकांचा सातत्याने प्रयत्न चालू आहे”, असे शाहू छत्रपती यांनी म्हंटले आहे.