Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेत महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? जयंत पाटील म्हणाले,…

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) दोघांकडून संपूर्ण ताकद लावून प्रचार केला जात आहे. यातच, महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यालाही सुरुवात झाली आहे. यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाष्य केले आहे.

” पंतप्रधान मोदी आणि अमित शहा जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या जागा वाढतील’, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे. एवढेच नाही, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? याची भविष्यवाणीही त्यानी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा येथे पुन्हा एकदा प्रचार करत आहेत. ते लोकसभेला जेथे जेथे फिरले होते, तेथे पराभव झाला होता, तेच चित्र यावेळीही असेल का? असा प्रश्न केला असता जयंत पाटील म्हणाले, “ते जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या जागा वाढतील. एवढेच नाही, तर १७० ते १८० च्या दरम्यान आमच्या जागा यायला हरकत नाही,” असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.