Hadapsar Pune Crime News | विनापरवाना उमेदवाराचा एअर बलुन लावला ! हॉटेल मालकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पुणे : Hadapsar Pune Crime News | हॉटेलच्या टेरसवर विना परवाना शिवसेना उमेदवाराच्या (Shivsena Candidate) नावाचा एअर बलुन लावून आचार संहिता भंग केल्याबद्दल हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शेखर अमरदीप कांबळे (वय ३८, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार रायॅल स्टे इन लॉजिंगचे मालक अक्षय अरुण पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मंडळ कृषी अधिकारी असून सासवड येथे कार्यरत आहेत. त्यांची विधानसभा निवडणुकीसाठी भरारी पथकासाठी पथक प्रमुख म्हणून निवड झाली आहे. ते कर्तव्यावर असताना ८ नोव्हेबर रोजी त्यांना कळविण्यात आले की फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंग या लॉजच्या टेरेसवर पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांचा शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण असलेला एअर बलुन बांधलेला आहे. तेथे जाऊन कारवाई करण्यात यावी, असे सांगण्यात आले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एस आर मोरे,व्हिडिओग्राफर एस ए आडाळगे हे तेथे पोहचले. टेरसवर एअर बलुन बांधलेला दिसला. लॉजचे मालक अक्षय अरुण पवार असून ते बाहेर असल्याचे तेथील कामगारांनी सांगितले. एअर बलुन विषयी परवानगी घेतली आहे का याची चौकशी केल्यावर परवानगीसाठी अर्ज केला आहे, अजून परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी आचारसंहिता कक्षाकडे चौकशी केल्यावर बलुनला कोणतीही परवानगी दिली नसल्याचे समजले. त्यानंतर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोढवे तपास करीत आहेत.