Supriya Sule On Devendra Fadnavis | भुजबळांच्या दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा घणाघात; म्हणाल्या – ‘फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…’

पुणे : Supriya Sule On Devendra Fadnavis | ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया’ (2024: The Election that Surprised India) या पुस्तकात ईडीपासून सुटका मिळावी यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar NCP) नेतृत्वाखाली भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं दावा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केल्याचा उल्लेख करण्यात आला. भुजबळांच्या दाव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
दरम्यान, आता राजकीय नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया देत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” तपास यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष आणि घर फोडण्याचं पाप अदृष्य शक्ती करते आहे. हे आम्ही गेले दोन वर्ष सांगत आहोत. हे फक्त महाराष्ट्रापूरतं मर्यादित नाही, तर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हेच सुरु आहे.
९५ टक्के ईडी आणि सीबीआयचे छापे (CBI Raid) हे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पडले आहेत. ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आरोप केले, त्यांनाच बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. मी संसदेतही यासंदर्भातील आरोप केले आहेत.
या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत. त्या वाचताना मला वाईट वाटलं. यात आमच्या पक्षातील नेत्यांबरोबच महिलांचाही उल्लेख आहे. अदृष्य शक्ती ही फक्त पुरुषांच्याच नाही, तर महिलांच्याही मागे लागते. याचं उदाहरण म्हणजे माझ्या तीन बहीणींच्या घरावर आयकर विभागाचा छापा.
एक दिवस नाही तर सलग पाच दिवस ही छापेमारी सुरू होती. त्यावेळी त्यांच्या घरात त्यांची नातवंड होती. घरात वेळेवर दुध येत नव्हतं. बंदुके घेऊन पोलीस फिरत होती. हे बघून त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल, याचा विचार अदृष्य शक्तीने केला का?
त्या पुढे म्हणाल्या, ” या पुस्तकात सुनेत्रा पवार यांचेही नाव आहे. हे दुर्देव आहे. यात त्यांचा उल्लेख करायची काहीही गरज नव्हती. तुमची लढाई आमच्याशी आहे, तर मग आमच्या घऱातील महिलांवर का आरोप करता? ज्यावेळी आर. आर. पाटील यांच्यावर या सगळ्यांनी मिळून आरोप केले. त्या फाईलवर शेवटची चौकशी कुणी लावली, तर ती देवेंद्र फडणवीस यांनी लावली. त्यावर त्यांचीच सही होती.
मुख्यमंत्री झाल्यावर ज्यांच्या विरोधात ही कारवाई सुरु झाली, त्याच अजित पवारांना त्यांनी घरी बोलवून ती फाईल दाखवली. हा गुन्हा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांविरोधात खटला भरला पाहिजे. त्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. या सगळ्यांची उत्तरं देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागतील”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.