Pune Cantonment Assembly Election 2024 | पुणे कँटोन्मेंट विधानसभा : रमेश बागवे यांचा विजय निश्चित! घोरपडी परिसरातील नागरिकांना विश्वास

Ramesh-Bagwe

पुणे : Pune Cantonment Assembly Election 2024 | कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना रोज वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. १० वर्षांत वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. घोरपडी भागात रेल्वे फाटकामुळे अनेक नागरिकांना रोज अर्धा-अर्धा तास ताटकळत राहावे लागत आहे. येथे उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे. मात्र केंद्रात व राज्यात १० वर्षे भाजप सत्तेवर असूनही घोरपडीतील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा रेल्वे उड्डाणपूल पूर्ण होऊ शकला नाही. कँटोन्मेंटचा विकास खुंटला आहे. कँटोन्मेंटमधील हे प्रश्न सोडविण्यासाठी यंदा परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांनी केले.

पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या पदयात्रेला घोरपडी भागात गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी घोरपडी आणि बी. टी. कवडे रस्ता, तसेच सायंकाळी दारूवाला पूल आणि सोमवार पेठ परिसरात निघालेल्या पदयात्रेचे नागरिकांनी जोरदार स्वागत करून विजय निश्चित असल्याचा विश्वास दिला. रमेश बागवे यांच्या पदयात्रेला प्रभाग क्रमांक २१ मधील घोरपडी बाजार राम मंदिर येथून सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. फैलवाली चाळ, आगवाली चाळ, पंचशीलनगर, घोरपडी गाव, विकासनगर, श्रावस्तीनगर, बालाजीनगर, श्रीनाथनगर, गुलमोहर पार्क, निगडेनगर, बी. टी. कवडे रस्ता, डोबरवाडी यामार्गे निघालेल्या पदयात्रेचा समारोप दुपारी कवळेमाळा येथे झाला.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत पदयात्रा पार पडली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Sharad Pawar NCP), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Shivsena Thackeray Group) आणि आप, तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते झेंडे घेऊन सहभागी झाले होते. महाविकास आघाडीतील‌ सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या पदयात्रेचे ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. महिलांनी रमेशदादा यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘कँटोन्मेंटचा विकास म्हणजे रमेशदादा’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पदयात्रेने संपूर्ण परिसर महाविकास आघाडीमय झाला होता. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, पुणे लोकसभेचे प्रभारी जगदीश ठाकूर, सुजाता शेट्टी, ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख,सुधाकर पनीकर, संजय कवडे,प्रदीप परदेशी, अभिजित गायकवाड, नितीन निगडे, अक्रम शेख, युसुफ शेख, रॉबर्ट रोबारियो, महेश मिश्रा, अनिरुद्ध मिश्रा, प्रेम परदेशी, मनोज बाट्टम, तेजस गरसूल, अमोल परदेशी, संजय वाघमारे, रवी वाजपेयी, राजू नायडू, कुमार राठोड, प्रकाश बर्गे, मदीस रॉवडन, विल्सन रेड्डा, विल्सन डॅनियल, डेरियास स्वामी, रिहाना खान, अँटोनी, अंजली पिल्ले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. सायंकाळच्या पदयात्रेला रवींद्र नाईक चौक ते दारूवाला पूल येथून सुरुवात झाली. सूर्योदय मंडळ, नागेश पेठ, खडीचे मैदान, नागेश्वर मंदिर, ब्राह्मण गल्ली, अमरज्योत मित्रमंडळ चौक, विजय बेकरी, बालाजी मंदिर, १५ ऑगस्ट चौक, महाराजा लॉज चौक, धनगर गल्ली, त्रिशुंड गणपती गल्ली, कमला नेहरू ते सत्यज्योत मंडळ, पद्मकृष्णा चौक, पारगे चौक, मंगल चौक, संग्राम चौक, भीमनगर, सदाआनंदनगर, श्रमिकनगर, मरिअम्मानगर, गाडीतळ परिसर, जुना बाजार, शिवाजी आखाडा यामार्गे निघालेल्या पदयात्रेचा समारोप शिवराय चौक येथे झाला.