Maharashtra Assembly Election 2024 | ‘महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार’, रोहित पवारांचा विश्वास; म्हणाले – ‘सत्तेसाठी आम्हाला महायुती सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही’

Rohit Pawar

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमदार रोहित पवार (Rohit Pawar MLA) भोसरी मतदारसंघात (Bhosari Assembly Election 2024) आले होते. दरम्यान त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) स्पष्ट बहुमत मिळणार असून सत्तेसाठी आम्हाला महायुती (Mahayuti) सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही’, असे विधान रोहित पवार यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, ” भोसरीमध्ये गेल्या काही वर्षात ठराविक लोकांचा विकास झाला आहे. आता बदल घडेल. भोसरी विधानसभेतून अजित गव्हाणे हे निश्चित आमदार होतील. अजित पवारांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून महायुतीचा पराभव दिसत आहे. त्यांना बहुमत मिळणार नाही.

अजित पवारांच्या पक्षाला वाटत आहे. आपण किंगमेकर म्हणून काम करू. परंतु, महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकमेकांची गळचेपी करत आहेत. ५७ ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले आहेत. महायुतीचा शंभर टक्के घोळ होणार आहे. अजित पवारांचे नेते घाबरलेले आहेत.”

ते पुढे म्हणाले, ” १७० आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत. मुख्यमंत्री सुद्धा महाविकास आघाडीचा होणार आहे. सत्ता स्थापनेसाठी आम्हाला महायुतीच्या सोबत असलेल्या पक्षांची मदत लागणार नाही”, असे रोहित पवार यांनीं म्हंटले आहे.