Wanwadi Pune Crime News | प्रॉपर्टीच्या वादातून 43 वर्षाच्या मुलाची वृद्ध वडिलांना मारहाण

3rd November 2024

पुणे : Wanwadi Pune Crime News | प्रॉपर्टीच्या वादातून (Property Dispute) ४३ वर्षाच्या मुलाने वडिलांच्या अंगावर खुर्ची फेकून मारुन जखमी केले. आईवडिल वृद्ध असताना त्यांना त्रास देऊन त्यांची हेळसांड करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हरी कन्हैया बिनावत (वय ७६, रा. संतोषनगर, कंजारभाट वस्ती, महंमदवाडी रोड) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र हरी बिनावत (वय ४३, रा. संतोषनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिर्यादीचे घरी गुरुवारी रात्री साडेआठ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिनावत पिता पुत्रांमध्ये प्रॉपर्टीच्या कारणावरुन वाद होत असतात. याच कारणावरुन राजेंद्र याने भांडणे काढून आपले वडिल हरी बिनावत यांच्या अंगावर खुर्ची फेकून मारली. त्यामुळे त्यांच्या उजव्या हाताला लागले. राजेंद्र याने वडिलांना अंगणामध्ये फरशी फेकून मारली.

राजेंद्र हा प्रॉपर्टीवरुन नेहमी जीवे मारण्याची धमकी देत असतो. फिर्यादी व त्यांची पत्नी दोघेही ज्येष्ठ नागरिक असताना सुद्धा त्यांचा मुलगा त्यांना नेहमी त्रास देऊन त्यांची हेळसांड करत असतो. आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधि नियमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करीत आहेत.