Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात प्रचाराला वेग; यंदा तुतारी वाजणार, पदाधिकारी कार्यकर्त्यांचा विश्वास

पुणे: Parvati Assembly Election 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी लढत पाहायला मिळणार आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपने विद्यमान आमदार (BJP MLA) माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना पुन्हा संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून अश्विनी नितीन कदम (Ashwini Nitin Kadam) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. दरम्यान या मतदारसंघात प्रचाराचे जोरदार वारे वाहू लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) उमेदवार अश्विनी कदम यांच्याकडून महाविकास आघाडीची प्रभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. पर्वती येथील सुहाग मंगल कार्यालय येथे ही आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रभाग क्रमांक ३६ मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यंदा मतदारसंघात बदलाचे वारे वाहू लागले आहे. मागील काही वर्षांत मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. यंदा तुतारी वाजणार, असा विश्वास यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.