Aundh Pune Crime News | फटाके उघडविण्यावरुन दोन गटात हाणामारी ! औंधमधील कस्तुरबा वसाहतीतील घटना

पुणे : Aundh Pune Crime News | दिवाळीतील फटाके वाजविण्यावरुन जुन्या भांडणाचा वाद उकरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. धारदार शस्त्राने तरुणांवर वार करुन त्यांना गंभीर जखमी करण्यात आले़ तर, दुसर्या गटाने दगड, लाकडी दांडक्याने मारहाण (Marhan) करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी आदित्य गणेश घुले (वय १८, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश रवी मोरे, रवी मोर (रा. कस्तुरबा वसाहत, औंध – Kasturba Vasahat Aundh ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा गुरुवारी रात्री सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवित होता. त्याचा राग मनात धरुन गणेश व रवी मोरे यांनी धारदार शस्त्राने मारहाण केली. फरशीचा तुकडा आदित्य याच्या पायावर मारल्याने त्याच्या पायाचे बोटाचे हाड तुटून बोटाचा अर्धा तुकडा पडला. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या समीर अल्लाउद्दीन शेख यांच्या डोक्यात, हातावर गणेश मोरे याने धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले.
याविरोधात गणेश रवींद्र मोरे (वय २४, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य घुले (वय १९), सलमान शेख (वय १८), समीर शेख (वय २३), प्रणव ऊर्फ गोल्या रोट (वय १९, सर्व रा. कस्तुरबा वसाहत, औंध) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांच्याशी आरोपींचे पूर्वी भांडणे झाली होती़ या कारणावरुन आरोपीनी लोखंडी धातूच्या पट्टीने डोक्यात, दगडाने व लाकडी दांडक्याने हाताला बोटावर मारुन खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यातून रक्त येईपर्यंत मारले. त्यामुळे त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. फिर्यादीची आई व चुलती भांडणे सोडविण्यासाठी आले असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. फिर्यादीचा मित्र सागर पवळ याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. फिर्यादीची आई, बहिण, चुलती व मित्र यांना लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण करुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक कारंडे तपास करीत आहेत.