Maharashtra Assembly Election 2024 | ‘युतीमध्ये उद्धव ठाकरे भाजपापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढायचे पण आता…’, चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

नागपूर : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसने (Congress) फसवणूक (Cheating) केली असून रामटेक मतदारसंघातून (Ramtek Assembly Election 2024) उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) उमेदवाराची जमानत जप्त करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक लढत असून रामटेकमध्ये उद्धव ठाकरेंचा ठरवून अपमान केला आहे”, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ” चार जागांसाठी उद्धव ठाकरेंनी भाजपासोबतची युती तोडली होती. उद्धव ठाकरे यांचा भाजपाकडून सन्मान केला जात होता. युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे बरोबरीने आणि भाजपापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढत होते.
लोकसभा निवडणुकीत त्यांचे अठरा खासदार निवडून आले होते. आता ते मुख्यमंत्रीपदाच्या लोभामुळे फसले आहेत. त्यांनी आपला हिंदुत्वाचा विचार सोडला आहे”, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.