Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड मतदारसंघात नाना काटे बंडखोरीवर ठाम; म्हणाले – “दादांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत….”

Nana-kate.

पुणे : Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar NCP) यांनी नाना काटे (Nana Kate) यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा देखील झाली. मात्र त्यानंतरही नाना काटे बंडखोरीवर ठाम आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपचे (BJP) उमेदवार शंकर जगताप (Shankar Jagtap) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यात सामना रंगणार अशी चर्चा होती मात्र आता अजित पवारांनी मनधरणी करूनही नाना काटे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने याचा फटका भाजपला बसेल अशी चर्चा आहे.

दरम्यान अजित पवारांच्या भेटीनंतर नाना काटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ” आमची फार काही चर्चा झाली नाही. दिवाळी निमित्त आम्ही भेटलो. दादांनी मला फोन केला आणि मी बारामतीला जाणार आहे, भेटून जातो म्हणाले त्यानुसार ते घरी भेटण्यासाठी आले होते.

ते आले तेव्हा राजकीय गोष्टीवर चर्चा झाली. निवडणुकीत काय परिस्थिती असेल याबाबत चर्चा झाली. अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा झाली नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीवर ठाम आहोत. महायुतीचा उमेदवार चिंचवड मधला आहे. त्यामुळे ते कदाचित आले असतील. दादांच्या पक्षांचा मी आहे, त्यामुळे ते आले असतील, मात्र, उमेदवारी मागे घेण्याबाबत आमच्यात चर्चा झाली नाही”, असे नाना काटे यांनी म्हंटले आहे.