Pune Pimpri Chinchwad Crime News | रिक्षात दारु पिऊ नका, असे सांगणार्‍या रिक्षाचालकाच्या डोक्यात दारुची बाटली फोडण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Marhan

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | रिक्षात बसून दारु पिऊ नका, असे सांगितल्याने दोघा गुंडांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करुन रिक्षाची काच फोडली. सिमेंटचा ब्लॉक फेकून मारला अन दारुची बाटली डोक्यात फोडण्याचा प्रयत्न केला. मला नासिर भाई म्हणतात, कासारवाडीचा (Kasarwadi) भाई असे म्हणून दहशत पसविण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी रिक्षाचालक आजीम गफर बागवान (वय २४, रा. कासारवाडी) या रिक्षाचालकाने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नासीरचॉद शेख (वय २५) आणि रितेश उजागरे (वय २१, दोघे रा. कासारवाडी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कासारवाडी येथील स्मशानभूमी समोरील रोडवर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्मशानभूमी समोरील रोडवर आपली रिक्षा पार्क केली होती. ते व्यवसायाला जाण्यासाठी रिक्षा घेण्यासाठी आले. त्यावेळी नासीरचॉद व रितेश हे रिक्षामध्ये दारु पित बसले होते. फिर्यादी यांनी त्यांना माझ्या रिक्षात दारु पिऊ नका, असे सांगितले. त्याचा राग मनात आणून दोघांनी धमकी देऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली. त्यांच्या रिक्षांची समोरील काच फोडून नुकसान केले. लाथाबुक्क्यांनी फिर्यादीस मारहाण केली. नासीरचॉद याने सिमेंटचा ब्लॉक फिर्यादीच्या डोक्यात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फेकला. फिर्यादी यांना तो हुकवित असताना रितेश याने दारूची बाटली फिर्यादीच्या डोक्यात जोरात फेकून मारली. ती देखील हुकवित असताना फिर्यादीचे डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यात फिर्यादीचा हात फ्रॅक्चर झाला. नासीरचॉद याने थांब तुला खल्लासच करुन टाकतो, अशी धमकी देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सिमेंटचा ब्लॉक हातात घेऊन तेथे जमलेल्या लोकांना म्हणाला की, खबरदार जर कुणी याच्या मदतीला आला एक एकाच्या डोक्यात ब्लॉक घालेल, मला नासीरभाई म्हणतात. मी कासारवाडीचा भाई आहे, अशी धमकी देऊन लोकांना घाबरवुन दहशत पसरवली. सहायक पोलीस निरीक्षक गुजर तपास करीत आहेत.