Pune Crime Branch News | ओडिशाहून आलेल्या दोघांकडून तब्बल 12 लाख 74 हजार रुपयांचा गांजा जप्त

पुणे : Pune Crime Branch News | ओडिशाहून आलेल्या दोघा जणांकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell Pune) १२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा ६१ किलो ६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. (Ganja Case)
मानश कुमार स्वाईन (वय ३८, रा. हरीहरपूर, जि. नया घर, ओडिशा), लालमोहन फ्रान्सींस बीर (वय ३४, रा. अतंराबा जि. गजपती, ओडिशा) आणि श्रीकांत अभिमन्यु बिरा (वय ३७, रा. मोहना, जि. गजपती, ओडिशा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करण्याबाबत मोहिम आखली आहे. त्या अनुषंगाने मंगळवार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व अंमलदार हे पुणे स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत होते. पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन येथील आगरकर नगर येथे सापळा रचून तिघांना पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा ६१ किलो ६० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, रवींद्र रोकडे, संदीप जाधव, युवराज कांबळे, सय्यद साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील, नितीन जगदाळे, प्रशांत बोमादंडी, मयुर सूर्यवंशी, उदय राक्षे, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.