Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेच्या प्रचारासाठी मोदी, शहा, गडकरी मैदानात उतरणार; कोणत्या नेत्याच्या किती सभा होणार? जाणून घ्या

Amit Shha-Narendra Modi

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह दिग्गज नेते महाराष्ट्रात सभा घेणार आहेत.

राज्यात भाजपकडून १०० हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भ, मुंबई -कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण ८ सभांचे नियोजन करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर अधिक सभांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही १५ सभा होणार आहेत. गोवा, मध्य प्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री देखील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत, अशी माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोणत्या नेत्याच्या किती सभा होणार ? ते खालीलप्रमाणे,

पंतप्रधान नरेंद्र मोदी – ८
अमित शहा – २०
नितीन गडकरी – ४०
देवेंद्र फडणवीस – ५०
चंद्रशेखर बावनकुळे – ४०
योगी आदित्यनाथ – १५