Sinhagad Road Pune Crime News | ‘फटाके वाजवू नको, भाईचे कान दुखत आहेत’; फटाका स्टॉल पेटवून देण्याची धमकी

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | फटाके वाजत असताना आरोपी तेथे येऊन इथे फटाके वाजवू नको, भाईचे कान दुखत आहे. नाही तर तुझा स्टॉल पेटवून देऊल, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत हर्षद अशोक रायकर (वय २१, रा. समृद्धी प्राईड सोसायटी, रायकर मळा, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रेयस अनंता कंदारे व दत्ता मरगळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धायरी येथील रायकर मळा येथील धायरेश्वर फटाका स्टॉल येथे रविवारी सायंकाळी ७ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फटाके वाजवित होते. त्यावेळी श्रेयस कंदारे हा तेथे आला. त्याने इथे फटाके वाजवु नको, भाईचे काम दुखत आहे, असे बोलला. त्याच्या सोबत असलेल्या दत्ता मरगळे याने तू इथे फटाके वाजवू नको, नाही तर तुझा स्टॉल पेटवून देईल, असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यांनी आणलेले कोयते फिर्यादीच्या अंगावर उगारुन निघून गेले. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करीत आहेत.