Chandrakant Patil | बाळगोपाळांना हवेहवेसे वाटणारे चंद्रकांतदादा!

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Chandrakant Patil | चंद्रकांतदादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोकळं ढाकळं व्यक्तिमत्व. राजकीय जीवनात काम करताना ते नेहमीच समाजकारणाला सर्वाधिक महत्व देतात. कधी ते ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना त्यांची कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात. तर कधी महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देतात. लहान मुलांशी तर ते एवढे एकरुप होऊन जातात की, त्यांनाही आपल्या वागणुकीने आपलंसं करुन टाकतात. कधी भेटलेल्या प्रत्येक बालगोपाळांना चॉकलेट देऊन त्यांचं तोंड गोड करतात किंवा त्यांनी एखादी वस्तू बनवली असेल, तर त्यांना प्रोत्साहित करतात. (Kothrud Assembly Election 2024)
तर झालं असं की, रविवारीही कोथरूडमध्ये नेहमीप्रमाणे त्यांचा भेटीगाठींचा उपक्रम सुरू होता. एरंडवणेतील संकुल सोसायटीमध्ये दादा एका खासगी भेटीसाठी आले होते. सोसायटीच्या पॅसेजमध्ये दिवाळीनिमित्त दोन लहानग्यांनी स्टॉल लावला होता. हा स्टॉल या दोघांनीही खरं तर पॉकेटमनी मिळवण्यासाठी लावला होता. या स्टॉलवर दिवाळीसाठी बनवलेल्या पणत्या, आर्टिफिशियल रांगोळी अशा वस्तू होत्या.
सोसायटीत येताच दादांची नजर त्या स्टॉलकडे गेली. त्यांनी कुतुहलाने त्या स्टॉलवर जाऊन चौकशी केली. दोघेही प्रचंड हुशार! एकाचं नाव अर्जुन आणि दुसरीचं मैथिली. दोघेही इतके हजरजबाबी की, स्टॉलवरील वस्तू विकण्यासाठी त्यांचं ज्या पदद्धतीने मांडणी आणि मार्केटिंग सुरू होतं, त्याचं सर्वांनाच कौतुक वाटत होतं. दादांनीही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू खरेदी करतानाच त्यांची विचारपूसही सुरू केली. दादांनी दोघांनाही चटकन आपलंसं केलं. त्यांनीही मग दादांसोबत मनसोक्त संवाद साधला…
दादांना माणसे जोडणारा माणूस का म्हणतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा उपस्थितांना आला!