Vasantrao Deshmukh Detained In Pune | जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंत देशमुखांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात

संगमनेर : Vasantrao Deshmukh Detained In Pune | भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी संगमनेर (Sangamner Assembly Election 2024) तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा घेतला होता. या मेळाव्यात वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. या वक्तव्यामुळे संगमनेरमध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वसंत देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात (Sangamner Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. देशमुखांवर पोलिसांनी कारवाई करावी यासाठी जयश्री थोरात व इतर नेत्यांना आंदोलन करावं लागलं होतं.
दरम्यान आता या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आज (दि.२७) पुण्यातून ताब्यात घेतले आहे.