Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार; कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे : Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | महाराष्ट्रातील विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. त्यानुसार आता पुणे जिल्ह्यातील २१ पैकी ८ जागांमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्येच निवडणूक रंगणार आहे. अजित पवारांच्या जिल्ह्यातील वर्चस्वाला ब्रेक लावण्याचा शरद पवार यांच्याकडून डाव खेळला जात असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झाल्यानंतर अजित पवार काही आमदारांना सोबत घेत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना आपला करिष्मा दाखवत १० पैकी ८ खासदार निवडून आणले. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार यांच्याकडे जाण्यास इच्छुक होते.
अनेकांनी पवार यांची भेट घेऊन इच्छाही व्यक्त केली. मात्र, पवार यांनी पक्ष फोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या विद्यमान आमदारांसाठी दारे बंद असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अनेक आमदारांच्या मनात पवार यांच्या डावपेचाबाबतची भीती निर्माण झाली.
मतदारसंघात कोणत्या उमेदवाराविरोधात कोण लढणार? खालीलप्रमाणे,
बारामती- अजित पवार (अजित पवार) विरुद्ध यूगेंद्र पवार (शरद पवार)
हडपसर- चेतन तुपे (अजित पवार) विरुद्ध प्रशांत जगताप (शरद पवार)
वडगाव शेरी- सुनील टिंगरे (अजित पवार) विरुद्ध बापू पठारे (शरद पवार)
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील (अजित पवार) विरुद्ध देवदत्त निकम (शरद पवार)
जुन्नर- अतुल बेनके (अजित पवार) विरुद्ध सत्यशील शेरकर (शरद पवार)
इंदापूर- दत्ता भरणे (अजित पवार) विरुद्ध हर्षवर्धन पाटील (शरद पवार)
शिरूर- ज्ञानेश्वर कटके (अजित पवार) विरुद्ध अशोक पवार (शरद पवार)
पिंपरी- अण्णा बनसोडे (अजित पवार) विरुद्ध सुलक्षणा शिलवंत (शरद पवार)