Pune Pimpri Chinchwad Crime News | व्यावसायिकाला एक लाखांच्या खंडणीची मागणी ! भावकीतील वादातून परस्परविरोधात तक्रार, कोयता मारुन मारहाण

Extortion (1)

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | व्यावसायिकाला एक लाखांची खंडणीची मागणी (Extortion Case) करुन जमिनीवर ढकलून सिमेंट गट्टूने मारहाण (Marhan) करुन जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देण्याचा प्रकार समोर आला आहे. भावकीतील वादातून परस्परावर हल्ले करण्याचा हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी निलेश मारुती गायकवाड (वय ४१, रा. मधुबन सोसायटी, मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिसांकडे (Pimpri Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कुंदन उमेश गायकवाड (वय २४), चंदन उमेश गायकवाड (वय २२, दोघे रा. लाल टोपीनगर, मोरवाडी), भूषण व बजरंग अशा चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोरवाडी येथील मोरजाई मंदिराजवळील अमित मेडिकल समोर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडली. कुंदन उमेश गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. ते त्यांच्या ओळखीचा आकाश राठोड यांच्यासह शुक्रवारी रात्री बोलत थांबले होते. त्यावेळी आपसात संगनमत करुन आरोपी तेथे आले. त्यांनी फियार्दी यांना एक लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांना जमिनीवर ढकलून दिले. सिमेंटचा गट्टू फेकून मारला. तो फिर्यादी यांनी हुकवला. त्यावेळी तेथे रस्त्याने जाणार्‍या लोकांची गर्दी जमल्याने आरोपींनी त्यांना आता वाचलास पुन्हा वाचणार नाही, अशी धमकी देऊन ते निघून गेले. सहायक पोलीस निरीक्षक पांडे तपास करीत आहेत.

त्याविरोधात कुंदन उमेश गायकवाड (वय २४, रा. लालटोपीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निलेश गायकवाड (रा. म्हाडा कॉलनी, पिंपरी), आकाश काशीनाथ राठोड, अरमान सलीम अत्तार, संदीप नामदेव मुरगुंड, सरफरोज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लाल टोपीनगरमधील नाना नानी उद्यानाजवळील विसर्जन हौदाजवळील झाडाखाली शनिवारी दुपारी १२ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या भावकीतील आहेत. फिर्यादीच्या वडिलोपार्जित जमीन आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे आहेत. या जमिनीवर फिर्यादी यांच्या घरातील लोकांची नावे लागले नाहीत याचा जाब कुंदन गायकवाड याने विचारला होता. त्या कारणावरुन निलेश गायकवाड याने इतर आरोपींशी संगनमत केले. फिर्यादी हे झाडाखाली बसले असताना आकाश राठोड व इतर आरोपी आले. आकाश याने शिवीगाळ करुन म्हणाला की, निलेश भाऊच्या नादी लागतो का, असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारला. त्यामुळे फिर्यादीच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने ते घाबरुन त्यांच्या घराच्या दिशेने पळत असताना उद्यानाच्या भिंतीलगत निलेश गायकवाड उभा होता. त्यावेळी इतरांनी पकडा त्याला पकडा असे म्हणत फिर्यादीच्या मागे पळत होते. जीवे मारण्याच्या उद्देशाने सर्वांनी संगनमत करुन कोयता डोक्यात मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक उबाळे तपास करीत आहेत.