Kalyani Nagar Pune Crime News | दारु पिऊन गाडी चालविणार्याने नाकाबंदीत पोलिसांना केली धक्काबुक्की

पुणे : Kalyani Nagar Pune Crime News | नाकाबंदी लावली (Pune Police Nakabandi) असताना दारु पिऊन वाहन चालविणार्यास थांबविल्यावर त्याने पोलिसांना धक्काबुक्की करुन पोलिसांचा मोबाईल हिसकावून घेतला.
याबाबत पोलीस अंमलदार संदीप हिरामण खंडागळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चिराग राजेंद्र मुंदडा Chirag Rajendra Mundada (वय २९, रा. नारायण पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कल्याणीनगर येथील बिशप स्कुलजवळ (Bishop’s School Kalyani Nagar) शनिवारी पहाटे २ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी हे नाकाबंदीत वाहन तपासणीचे काम करत होते. त्यावेळी चिराग मुंदडा हे दारु पिऊन वाहन चालवत नाकाबंदीच्या ठिकाणी आले. त्यांना थांबविले असता त्यांनी फिर्यादी यांना सरकारी काम करु न देता त्यांना धक्काबुक्की केली. फिर्यादी यांना हाताने धक्का मारुन फिर्यादीचा मोबाईल हातातून घेऊन अडथळा निर्माण केला. दारु पिऊन वाहन चालविल्याबद्दल मुंदडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. सहायक पोलीस निरीक्षक लामखडे तपास करीत आहेत.