Aundh-Baner Pune Crime News | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चितळे बंधु मिठाईवाले दुकानाचे शटर उचकटून दीड लाखांची रोकड लंपास (Video)

Theft In Shop Of Chitale Bandhu

पुणे : Aundh-Baner Pune Crime News | दिवाळी अगदी तोंडावर आल्याने मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी पाहून चोरट्याने चितळे बंधु (Chitale Bandhu) मिठाईवाले यांचे औंध बाणेर रोडवरील दुकान लक्ष्य केले. चितळे बंधु मिठाईवाले यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानातील १ लाख ४१ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केले. रविवारी पहाटेच्या सुमारास औंध -बाणेर रोडवरील दुकानात ही घटना घडली.

चितळे बंधु मिठाईवाले यांच्या औंध-बाणेर रोडवरील येथील दुकान आज सकाळी उघडण्यास कामगार आले. तेव्हा शटर उचकटलेले दिसून आले. चोरट्याने शटर उचकटून आत प्रवेश केला. टेबलाचे ट्रॉवर उचकटून त्यातील १ लाख ४१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये (CCTV Footage) चोरटा कैद झाला असून पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली आहे. चोरट्याने तोंड झाकून घेतले असल्याने त्याचा चेहरा दिसून येत नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बालकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi) यांनी सांगितले. (Baner Police Station)

दिवाळी सण तोंडावर आल्याने दुकानात फराळ, मिठाई खरेदी करण्यासाठी गर्दी वाढलेली आहे. त्यात शनिवार, रविवार बँका बंद असल्याने दिवसभरात जमा झालेली रोकड दुकानातच ठेवलेली होती. ही संधी साधून चोरट्याने डाव साधला़ बाणेर पोलीस अधिक तपास करीत आहेत.