Shivsena Thackeray Group | शिवसेना ठाकरे गटाकडून तिसरी यादी जाहीर

मुंबई : Shivsena Thackeray Group | महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने आज दुसरी यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही २२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये वर्सोवा – हरुन खान, घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव, विलेपार्ले – संदिप नाईक यांच्या नावाचा समावेश आहे.
मुंबईतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत अनेक दिवस चर्चा सुरु होत्या. आतापर्यंत महाविकास आघाडीकडून मुंबईतील २४ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून १९ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर, काँग्रेसने ४ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने एका जागेवर उमेदवार जाहीर केला आहे.
महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष प्रत्येकी ९० जागांवर लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्यानुसार, आता उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत.