Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी शरद पवार गटाची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ! खडकवासलामधून सचिन दोडके, पिंपरीमधून सुलक्षणा शिलवंत, पर्वतीमधून अश्विनी कदम, बीडमधून संदीप क्षीरसागर, तर माळशिरसमधून उत्तम जानकर निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : Sharad Pawar NCP | विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (दि.२६) राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेत दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत खडकवासला- सचिन दोडके, पिंपरी – सुलक्षणा शिलवंत, पर्वती- अश्विनी कदम, बीड-संदीप क्षीरसागर, यांच्या नावाचा समावेश आहे.
जाहीर करण्यात आलेली उमेदवार आणि मतदारसंघाची यादी खालीलप्रमाणे
एरंडोल-सतीश पाटील
गंगापूर-सतीश चव्हाण
शहापूर-पांडुरंग बरोरा
परांडा-राहुल मोटे
बीड-संदीप क्षीरसागर
आर्वी- मयुरा काळे
बागलाण-दीपिका चव्हाण
येवला-माणिकराव शिंदे
सिन्नर-उदय सांगळे
दिंडोरी- सुनीता चारोस्कर
नाशिक पूर्व-गणेश गिते
उल्हासनगर-ओमी कलानी
जुन्नर-सत्यशील शेरकर
पिंपरी – सुलक्षणा शिलवंत
खडकवासला-सचिन दोडके
पर्वती- अश्विनी कदम
अकोले- अमित भांगरे
अहिल्यानगर शहर-अभिषेक कळमकर
माळशिरस-उत्तम जानकर
फलटण-दीपक चव्हाण
चंदगड-नंदिनी बाभूळकर
इचलकरंजी-मदन कारंडे