Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Raid On Gambling Den

पुणे : Pune Police Raid On Gambling Den | मटका किंग नंदू नाईक (Nandu Naik) याच्या शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth Pune) जनसेवा भोजनालय येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून ६० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Mataka King Nandu Naik Pune)

नंदू नाईक हा मटका किंग म्हणून ओळखला जातो. त्याचे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्डे आहेत. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर हे जुगार अड्डे काही दिवस बंद राहतात. त्यानंतर पुन्हा सुरु होतात. शुक्रवारी पोलिसांनी ज्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्याच जुगार अड्ड्यावर पोलिसांनी ऑगस्टमध्ये धाड टाकून २ लाख रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य जप्त केले होते. त्यानंतर आता हा जुगार अड्डा पुन्हा सुरु असल्याचे आढळून आले. नंदू नाईक याच्यावर मोक्का (Pune Police MCOCA Action) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

गुन्हे शाखेने घातलेल्या या छाप्यात पोलिसांनी ६० जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच १ लाख २५० रुपये रोख, ४७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अतिमेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथके, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथ, युनिट १ व ५ च्या पथकाने केली आहे.