Pune Crime News | चोरट्यांकडून 4 दुचाकी वाहने, 6 मोबाईल हस्तगत ! अल्पवयीन मुलांच्या मदतीने करत होता चोर्या

पुणे : Pune Crime News | सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वाहन चोरट्यांचा शोध घेत असतानाच संशयास्पदरित्या जाणार्या चोरट्यांना पकडून समर्थ पोलिसांनी ४ दुचाकी वाहने व ६ मोबाईल जप्त केले आहेत. (Mobile Theft Case)
अविनाश पप्पु अडसुळे (वय १८, रा. वारजे माळवाडी) व सुशांत ऊर्फ बंटी बाबुराव शिंदे (वय १८, रा. वारजे माळवाडी) यांना अटक केली असून त्यांनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने या चोर्या केल्याचे निष्पन्न झाले आहेत. (Samarth Police Station)
वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अंमलदार शेख, गावडे, घोरपडे यांनी घटनास्थळ व आजू बाजूचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाआधारे तसेच बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध घेत सारस्वत कॉलनी परिसरात आले. त्यावेळी त्यांना पाहून दोघे जण त्यांच्याकडील दुचाकीवरुन पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी दोघांना पकडून चौकशी केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात दोघांनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी वाहने तसेच मोबाईल फोन चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून ४ दुचाकी व ६ मोबाईल, १ कॉलेज बॅग, महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील एक तर समर्थ पोलीस ठाण्यातील ३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. (Vehicle Theft Detection)
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सहायक पोलीस फौजदार पागार, पोलीस अंमलदार इम्रान शेख, रोहिदास वाघेरे, रवींद्र औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, रहीम शेख, शरद घोरपडे, अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे.