BJP 2nd List For Assembly Election 2024 | भाजपची दुसरी यादी जाहीर! कसब्यातून हेमंत रासने, खडकवासल्यातून भीमराव तापकीर, पुणे छावणी मधून सुनील कांबळे, पंढरपूरमधून समाधान आवताडे तर जत मधून गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : BJP 2nd List For Assembly Election 2024 | भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण २२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पण या घोषणेनंतर काही मतदारसंघांमध्ये महायुतीमधील अंतर्गत कलह उफाळून येण्याची चिन्ह आहेत.
कसबा मतदारसंघातून हेमंत रासने, खडकवासला मधून भीमराव तापकीर, पुणे छावणी मधून सुनील कांबळे, पंढरपूरमधून समाधान आवताडे, तर जत मधून गोपीचंद पडळकर यांच्या नावांसह २२ जणांचा समावेश आहे.
राम भदाणे – धुळे ग्रामीण
चैनसुख संचिती – मलकापूर
प्रकाश भारसाकले – अकोट
विजय अग्रवाल – अकोला पश्चिम
श्याम खोडे – वाशिम
केमलराम काळे – मेळघाट
मिलींद नरोटे – गडचिरोली
देवराव भोंगले -राजुरा
कृष्णालाल सहारे – ब्रम्हपुरी
करन देवतले – वरोरा
देवयानी फरांदे- नाशिक मध्य
हरिचंद्र भोये- विक्रमगड
कुमार आयलानी- उल्हासनगर
रवींद्र पाटील- पेन
भीमराव तापकीर- खडकवासला
सुनील कांबळे- पुणे छावणी
हेमंत रासने- कसबा
रमेश कराड- लातूर ग्रामीण
देवेंद्र कोठे- सोलापूर शहर मध्य
समाधान आवताडे- पंढरपूर
सत्यजित देशमुख- शिराळा
गोपीचंद पडळकर- जत