Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

Three Cops Suspended In Pune | 3 police personnel (Cops 24 Beat Marshal) who took a bribe of Rs. 3 thousand suspended! They threatened the society president by saying that a complaint was received on dial 112

पुणे : Three Cops Suspended In Pune | ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) वैद्यकीय तपासणी करुन पुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) घेऊन येत असताना मोक्क्यातील आरोपीने (Criminal In MCOCA Case) बेडीतून हात काढून घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav) यांनी तिघांना निलंबित केले.

पोलीस अंमलदार सुशांत राजेंद्र भोसले (Sushant Rajendra Bhosale), विठ्ठल बप्पाजी घुले (Vittal Bappaji Ghule), सुरज हिराचंद ओंबासे (Suraj Hirachand Ombase) अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

येरवडा पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये मोक्कातील गुन्ह्यात अटक केलेल्या तिघा आरोपींना ठेवण्यात आले होते. आरोपी निखिल मधुकर कांबळे Nikhil Madhukar Kamble (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) हा सोमवारी २१ ऑक्टोंबर रोजी सकाळपासून पोटात दुखत असल्याची तक्रार करत होता. त्यामुळे त्याला व त्यांच्या दोन साथीदारांना घेऊन ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा आदेश या तिघांना देण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी तिघांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर परत पोलीस ठाण्यात येत असताना गुंजन चौकात कांबळे याने खूप त्रास होत आहे. पाणी द्या नाही तर मला काहीतरी होईल असे बोलून गयावया करु लागला. तेव्हा रात्री पावणे दहा वाजता पाणी आणण्यासाठी गाडी थांबविण्यात आली. त्याचवेळी निखिल कांबळे याने त्यांच्या डाव्या हातातील बेडीमधून हात अलगद काढून गाडीचा दरवाजा उघडून पलायन केले होते.

पोलीस दलासारख्या शिस्तप्रिय खात्यातील जबाबदारीचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. पोलिसांचे हे वर्तन बेशिस्त व बेजबाबदारपणाचे असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.