Sangola Assembly Election 2024 | पुणे: खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापडलेल्या 5 कोटींबाबत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “ठाण्याची दाढी आमच्यासोबत…”

Shahaji Bapu Patil

पुणे : Sangola Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी (Police Nakabandi) करत वाहनांची तपासणी सुरु आहे. दरम्यान पुण्यात नाकाबंदी दरम्यान ५ कोटींची रोकड सापडली होती. हे ५ कोटी रुपये आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर येत होती.

सविस्तर माहिती अशी की, खेड-शिवापूर टोल नाक्यावर (Khed Shivapur Toll Naka) जवळपास ५ कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. ही रक्कम शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप करण्यात आला होता.

शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टार्गेट केले होते. प्रत्येक उमेदवाराला ते ७५ कोटी देणार आहेत. त्यातील १५ कोटींचा हा पहिला हफ्ता होता ,असा आरोपही राऊत यांनी केला होता. दरम्यान हे आरोप शहाजी बापू पाटील यांनी फेटाळले होते.

त्यानंतर आता शहाजी बापू यांच्या कार्यकर्त्याने याबाबत मोठं विधान केलं आहे. नाकाबंदी दरम्यान सापडलेल्या ५ कोटी रुपयांबाबत बोलताना सांगोला शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे (Dadasaheb Lavte) म्हणाले, त्या गाडीची चर्चा करू नका. त्यासाठी ठाण्याची दाढी आमच्यासोबत आहे, असं म्हणत लवटे यांनी या प्रकरणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.