Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

पुणे : Pune Crime Branch News | रिक्षाचालकाचा पाठलाग करुन त्याला मारहाण करुन पायाचे हाड फॅक्चर करुन त्याच्याकडील रोख रक्कम चौघांनी लुबाडून नेण्याचा प्रकार कोंढव्यात जुलै महिन्यात घडला होता. या गुन्ह्यातील फरारी आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने पकडले आहे. (Arrest In Robbery Case)
मोहित रवी शेलार Mohit Ravi Shelar (वय १९, रा. श्रीराम चौक, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत रिक्षाचालक अल्लाउद्दीन मोहम्मद हानिफ सिद्दिकी (वय ३९, रा. हांडेवाडी रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली होती. ते ४ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता रिक्षा घेऊन घरी जात असताना दोन दुचाकीवरुन चौघांनी त्यांच्या रिक्षाचा पाठलाग केला.
इनामदार नगर येथे त्यांना रिक्षा थांबविण्यास भाग पाडले. त्यांच्या खिशात हात घालून ९ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांच्या पोटात लाथ मारल्याने ते खाली पडले. चोरट्यांनी दगडफेक करुन त्याच्या पायावर, पोटावर हातावर मारहाण करुन जखमी केले. या मारहाणीत त्यांच्या पायाचे नडगीचे हाड व मनगटाचे हाड फॅक्चर झाले होते.
गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक निवडणुकीच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस अंमलदार मुंढे, हवालदार सकटे व कारखिले हे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की हांडेवाडी रोड (Handewadi Road) येथे जुलै महिन्यात झालेल्या जबरी चोरीतील गुन्हेगार साई मंदिर चौक येथे थांबला आहे. त्यानुसार पोलीस पथक काळेपडळ येथील साई मंदिर चौकात गेले. त्यांनी मोहित शेलार याला ताब्यात घेतले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन पुढील कारवाईसाठी त्याला कोंढवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण (PI Wahid Pathan) यांनी कळविले आहे.