Pune PMC News | पुणे महानगरपालिका संचलित विशेष मुलांच्या शाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी बनविलेल्या दिपावली उपयुक्त वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री

Exhibition and sale of Diwali useful items

पुणे – Pune PMC News | पुणे महानगरपालिका संचलित विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र.14 बी, शिवाजीनगर गावठाण, पुणे या शाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी बनविलेल्या दिपावली उपयुक्त वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री या उपक्रमाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांच्या शुभहस्ते करण्यात आला, यावेळी त्यांनी या उपक्रमाची व विशेष शाळेबाबत माहीती घेतली.

महापालिका आयुक्त यांनी विशेष विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत, विशेष विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबाबत चर्चा केली. तसेच शाळेच्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या उपक्रमात निशा चव्हाण Nisha Chavan (मुख्य विधी अधिकारी, पुणे मनपा) यांच्या शुभहस्ते सरस्वतीपूजन व सावित्रीबाई फुले यांचे पूजन करण्यात आले. मा. निशा चव्हाण यांनी उपक्रमास भेट देऊन पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला . विशेष विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करून त्यांना खाऊ वाटप केले.

        या उपक्रमाचे आयोजन विशेष शाळेच्या शिक्षिका वर्षा काळे व सर्व कर्मचारी यांनी केले. तसेच उपक्रमासाठी सर्व विशेष विद्यार्थ्यांच्या पालकांचे सहकार्य लाभले.