Lawrence Bishnoi Gang | लॉरेन्स बिष्णोई टोळीतील शुभम लोणकरशी संबंधित चौघांना पुण्यातून घेतले ताब्यात; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण

पुणे : Lawrence Bishnoi Gang | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या (Baba Siddique Murder Case) कटातील शुभम (Shubham Lonkar) व प्रविण लोणकर (Pravin Lonkar) यांच्याशी संबंधित चौघांना मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेच्या पथकाने (Mumbai Crime Branch) कर्वेनगर परिसरातून (Karve Nagar Pune) ताब्यात घेतले आहे.
रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम कोहोळ, रियान खान अशी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात यापूर्वी पुण्यातून लोणकर डेअरीचा चालक प्रवीण लोणकर याला अटक केली आहे. तसेच पुण्यात काही काळ काम करणारे धर्मराज कश्यप, गुरुनील सिंग यांना अटक केली आहे.
प्रवीण लोणकर कर्वेनगर भागात डेअरी चालवितो. प्रविण व त्याचा भाऊ शुभम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून बिष्णोई टोळीतील सराईतांच्या संपर्कात होते. त्यातूनच बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्याचा कट पुण्यात रचण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. बिष्णोई टोळीला पिस्तुल पुरविल्याप्रकरणी शुभम लोणकर याला अकोला पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. त्यावेळी शुभमचा बिष्णोई टोळीशी संबंध उघड झाला होता.
बिष्णोई टोळीने शहरातील एका नामांकीत सराफी पेढीच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण पुढे आले होते. तसेच शंकरशेठ रोडवरील एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकविण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.