Indapur Assembly Constituency | ‘बाबीर बुवाच्या गुलालाची शप्पथ आता काहीही झालं तरी माघार नाही’, प्रवीण मानेंनी रणशिंग फुंकलं; इंदापूरात होणार तिहेरी लढत

Pravin Mane-Dattatray Bharne-Harshvardhan Patil

इंदापूर : Indapur Assembly Constituency | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. इंदापूरमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) म्हणजेच दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) विरुद्ध हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) असा सामना रंगणार अशी चर्चा होती. मात्र याठिकाणी प्रवीण माने (Pravin Mane Indapur) यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केल्याने याठिकाणी तिहेरी सामना पाहायला मिळणार आहे. “बाबीर बुवाच्या गुलालाची शप्पथ आता काहीही झालं तरी माघार नाही”, म्हणत प्रवीण माने यांनी रणशिंग फुंकलं आहे.

प्रवीण माने म्हणाले, “आजवर तुम्ही हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांना संधी दिली आहे. मला एकदा पाच वर्षे संधी देऊन बघा. तुमचा सेवक म्हणून मी काम करेल. शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचाराचा तालुका आपण निर्माण करून दाखवू. (Sharad Pawar NCP)

इंदापूर तालुक्याचा १९९५ सालचा इतिहास पाहा. इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे, जेव्हा तिरंगी लढत होते. तेव्हा जो उमेदवार अपक्ष उभा राहतो, तेव्हा तो इंदापूर तालुक्यातून निवडून येतो हा इतिहास आहे. लोकांनी सांगितलं आहे आता जर माघारी घेतली तर तुमचा नंबर डिलीट करून टाकू.” (Ajit Pawar NCP)

ते पुढे म्हणाले, ” आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे. परिवर्तनाच्या लढाईत समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे, हे लक्षात ठेवा. मी एकटा आमदार होणार नाही. आज सकाळी बाबीर बुवाला नारळ फोडून नतमस्तक झालो.

बाबीर बुवाचा गुलाल घेऊन आलोय. या गुलालाची शप्पथ घेऊन सांगतो, की तुमच्या पाठिंब्यामुळेच मी आज विधानसभेला अर्ज भरत आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी दाखल केलेला अर्ज काढणार नाही”,असं म्हणत प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.