Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभेत तुतारी चिन्हावर लढण्यासाठी तिघेजण आग्रही; काटे, कलाटे, नखाते यांच्यापैकी उमेदवारी कोणाला? शहरात घडामोडींना वेग

Nana-Kate-Rahul-Kalate (1)

पुणे : Chinchwad Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची (Sharad Pawar NCP) डोकेदुखी वाढली आहे. चिंचवड विधानसभेचे तिकिट मिळविण्यासाठी नाना काटे (Nana Kate), राहुल कलाटे (Rahul Kalate) आणि चंद्रकांत नखाते (Chandrakant Nakhate) यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. तिघेही तुतारी (Tutari) चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहेत.

या भेटीत तिघांना एकमत करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत. त्यामुळं या तिघांचं एकमत झालं नाही तर पवार स्वतः एका नावाची घोषणा करणार आहेत. मात्र राहुल कलाटेंना तिकीट मिळालं तर नाना काटे काय भूमिका घेणार? आणि नाना काटेंना उमेदवारी मिळाली तर राहुल कलाटे पुन्हा बंडखोरी करणार का? अशी चर्चा शहरात सुरु आहे.

महायुतीकडून (Mahayuti) भाजपने याठिकाणी आपला उमेदवार जाहीर केला आहे. पहिल्या यादीमध्ये शंकर जगताप (Shankar Jagtap) यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) तीन जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याने उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची त्याबाबत तिढा निर्माण झाला आहे.