Chandan Nagar Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी गजाने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांना केली अटक

Arrested-1-3

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याने तरुणाला लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन सहा जणांना अटक केली आहे.

कैलास शंकरलाल भाटी (वय २४), सोहनलाल अस्लाराम प्रजापती (वय २८), दीपककुमार दलाराम प्रजापती (वय २०), विक्रम नगाराम प्रजापती (वय १९), चंदन केशराम मेघवाल (वय २०), सुखदेव पुनराम मेघवाल (वय २२, सर्व रा. वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अमित दिलीप आरणे (वय ३५, रा. निलेश अंगण सोसायटी, गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि प्रेम भाटी यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. फिर्यादी हे २० ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजता वडगाव शेरीमधील सोपाननगर येथील तेजस वाईन्समधून दारु घेऊन घरी जात होते. यावेळी प्रेम भाटी, त्यांचा भाऊ कैलास भाटी हे त्यांच्या पान शॉपसमोर कामगारांसह उभे होते. पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन त्यांनी शिवीगाळ करुन ‘‘इसको छोडो मत, उसको मार डालो,’’ असे म्हणून जीवे मारण्याचा हेतूने फिर्यादी यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने मारहाण केली. इतरांनी हातापायांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या डोक्यात पाठीमागे टाके पडले असून नाक फ्रॅक्चर झाले आहे. इतर ठिकाणी जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन सहा जणांना अटक केली़ सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.