Sushma Andhare On BJP | ‘पहाटेच्या शपथविधी दिवशीच भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा हिशोब जनता करेल’, सुषमा अंधारेंचे टीकास्त्र

नागपूर : Sushma Andhare On BJP | शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण काढत महायुती सरकारवर (Mahayuti Govt) निशाणा साधला आहे. महायुती सरकारचा पहाटेचा शपथविधी २३ नोव्हेंबरला झाला होता. यावेळी विधानसभेचा निकालही २३ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा हिशोब जनता व्याजासकट चुकता करेल, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “जागा वाटपाची बोलणी अनिल देसाई आणि संजय राऊत करत आहेत. काही जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यात पारनेर, हडपसर आहे. कुटुंबातील लहान बहीण म्हणून सांगते, दोन पाऊल आम्ही मागे जातो, दोन पाऊल तुम्हीही मागे घ्या. किमान बैठकीला बसून रहा, निघून गेले तर चर्चा कशी होईल”, असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले.

मी निवडणूक लढण्यापेक्षा पक्षासाठी प्रचार सभा ताकदीने केल्या पाहिजे, अशी इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बळवंत वानखेडे आमदार होते. आता खासदार आहेत. त्यामुळे दर्यापूर जिंकू शकतो. मशाल पेटवण्यासाठी मदत करू असे बळवंत वानखडे म्हणाले होते. यशोमती ठाकूर यांच्यासमोर तशी भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले.