Pune Crime Branch News | रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसासह केले जेरबंद

Pune Crime Branch (2)

पुणे : Pune Crime Branch News | डायस प्लॉट परिसरात आलेल्या रेकॉर्डवरील (Criminal On Police Record) गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने पकडून त्याच्याकडून पिस्टल व काडतुस असा ५० हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला आहे. (Pistol Seized)

सज्जन सुनिल जाधव (वय १९,रा. डांगे चौक, पिंपरी गाव, मुळ रा. रेणुशीमोरा, महाबळेश्वर, सातारा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना बातमी मिळाली की, गुलटेकडी येथील डायस प्लॉट येथे एक जण पिस्टल घेऊन थांबला आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व त्यांचे पथक डायस प्लॉट येथे गेले. त्यांनी सज्जन जाधव याला पकडून त्यांच्याकडून सिल्व्हर रंगाचे मॅगझीनसह पिस्टल व एक जिवंत काडतुस हस्तगत केले. स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, अशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेद्र चव्हाण, विनोद चव्हाण, ओम कुंभार, हनुमंत कांबळे, गणेश थोरात, विजय पवार, राहुल शिंदे, अमोल सरडे व नागेश राख यांनी केली आहे.