Pune Crime Branch News | दुचाकी चोरणार्‍या आरोपीकडून गाडी जप्त !

पुणे : Pune Crime Branch News | दुचाकी चोरणार्‍या आरोपीकडून दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने एक दुचाकी हस्तगत केली आहे. साहिल सागर शेलार (वय २०, रा. टकलेवाडी, पानशेत रोड, गोर्‍हे खुर्द, ता. हवेली) असे या चोरट्याचे नाव आहे. (Vehicle Theft Detection)

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दुचाकी गाड्यांचा शोध घेत होते. यावेळी पोलीस अंमलदार महेश पाटील यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली की, मंगळवार पेठेत एक जण चोरीच्या गाडीसह थांबलेला आहे. या बातमीनुसार पोलीस पथक गुप्ता प्लॉटचे समोर गेले. तेथे थांबलेल्या साहिल शेलार याला पकडले. त्याच्याकडील दुचाकीची चौकशी केल्यावर त्याने ती चोरीची असल्याची कबुली दिली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला आहे. पुढील कारवाईकरीता त्याला सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Arrest In Vehicle Theft)

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, गणेश ढगे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, रवींद्र लोखंडे, महेश पाटील, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, नारायण बनकर यांनी केली आहे.