Pune Crime News | विरोधकांबरोबर फिरणार्‍या तरुणाला टोळक्याने केली बांबुने बेदम मारहाण ! पुन्हा फिरलास तर सोडणार नसल्याची दिली धमकी

पुणे : Pune Crime News | आमच्या विरोधकांबरोबर का फिरतो, असे म्हणून टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी व बांबुने बेदम मारहाण (Bedum Marhan) केली. पुन्हा फिरताना दिसल्यास सोडणार नाही, अशी धमकी दिली.

याबाबत मिलिंद लहु दहिरे (वय ३४, रा रामनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अल्पेश ऊर्फ सोन्या वाघमारे (वय २९), गौरव शेळके (वय २४), अनिल कांबळे (वय २४), अतिशा डावारे (वय २५, सर्व रा. रामनगर, वारजे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रामनगरमधील आबा बराटे यांच्या गोठ्यावर १५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. (Attack On Youth)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र अल्पेश वाघमारे याने फिर्यादीस भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार ते आबा बराटे यांच्या गोठ्यावर गेले. तेथे त्याचे मित्रही आले होते. त्यांनी पूर्वीच्या भांडणाचे कारणावरुन तू माझ्या विरोधकाबरोबर का फिरतो, असे म्हणून अल्पेश वाघमारे याने फिर्यादीस शिवीगाळ करुन बांबुने मारहाण केली. त्याच्या मित्रांनी फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू आमचे मंडळाच्या विरुद्ध काम केले किंवा आमच्या विरोधकाबरोबर फिरलास तर तुला सोडणार नाही, असे म्हणून धमकी दिली. पोलीस अंमलदार खटके तपास करीत आहेत.